Nashik Crime: नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची हत्या करण्यात आली आहे.ही घटना रविवारी 10 मार्च रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. अमोल काठे असं मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांची तपासणी चालु आहेत. हे घटना शहरातील महामार्ग पार्क येथे घडली. हेही वाचा- कोयता गँगचीने रात्री वाहनांची केली तोडफोड, पुण्यात नेमकं चाललं तरी काय
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चक्र फिरवत पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. या घटनेत आरोपीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत अमोल काठे यांचा भाऊ कुंदन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. चेतनच्या पत्नीचे अनैतिक संबंध अमोल काठे यांच्याशी असल्याचे संशय आला होता. त्यानंतर चेतनने अमोल याला ठार मारायचे ठरवले. अमोलमुळे चेतनचा संसार उध्दवस्त झाल्याचा रागातून हत्या केल्याचे समोर आले आहे.
चेतन रविवारी अमोलला भेटण्यासाठी महामार्गावरील पार्क येथे गेला. तेथे त्यांच्या वाद झाला होता. अमोलने सोबत बंदुक आणली होती. चेतनने बंदुक हिसकावून थेट अमोलवर गोळीबार केला. मध्यस्ती करण्यासाठी अमोलने त्यांच्या भावाला देखील आणले होते. या गोळीबाराच्या घटनेत अमोलच्या भावाला गंभीर जखमा झाल्या आणि अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी लगेच चक्र फिरवत आरोपीला अटक केले आहे. रविवारच्या या घटनेमुळे नाशिक शहर हादरले आहे.