अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्यप्रकरणी सीबीआयने विक्रम भावे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच या दोघांना सीबीआय (CBI) कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु आज पुणे सत्र न्यायालयाने आरोपी विक्रम भावे (Vikram Bhave) याच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
विक्रम भावे याला ठाण्यातील गडकरी रंगायतन बॉम्ब स्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती. तर आता यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर त्याला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे, त्याचसोबत दाभोळकर हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे असा आरोप पुनाळेकर याच्यावर आहे. तर भावे याच्यावर दाभोळकर याने आरोपींना त्यांची ओळख करुन देणे, घटनास्थळाची रेकी करणे असे आरोप लावण्यात आले आहे.(Narendra Dabholkar Murder case: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची संशयित आरोपी शरद कळसकर याची कबुली)
ANI ट्वीट:
Pune Sessions Court has granted 90 days extension to Central Bureau of Investigation (CBI) to file a chargesheet against Vikram Bhave an accused in Narendra Dabholkar murder case.
— ANI (@ANI) August 22, 2019
20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात सकाळच्या वेळेस दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे ही दोन नावे समोर आली. या दोघांनी मिळून हत्येसंर्भातील पुरावे, हत्यारे नष्ट करण्यास मदत केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती.