नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

खासदार नितेश राणे यांनी कोकणातील मुंबई - गोवा हायवेवर असलेले खड्डे आणि प्रवाशांना होणार्‍या त्रासाचा निषेध करता सरकारी अधिकार्‍याला चिखलाची आंघोळ घातली. या प्रकाराचा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकाराचा नारायण राणे यांनीही निषेध केला आहे. नितेश राणे हा नारायण राणेंचा धाकटा मुलगा आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ (Video)

नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हायवे चं काम रेंगाळल्याने त्याचा निषेध करताना सरकारी उपयंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाची बादली पालथी केली. हायवेच्या त्रासाचा प्रश्न आणि त्याचा जाब संबंधित व्यक्तीला विचारणं योग्य आहे. मात्र त्यासाठी सराकरी अधिकार्‍याच्या अंगावर चिखल ओतणं हे चूकीचं असल्याची माहिती नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

नितेश राणे हा आमदार आहे. गडनदी पुलावर शेडेकरांना नेऊन स्वामिमान कार्यकर्त्यांनी काय स्थिती आहे त्याचं दर्शन घडवलं. त्यानंतर अरेरावीची भाषा करत आधी चिखल ओतला आणि त्यानंतर दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला.