नंदूरबार (Nandurbar) येथील गणेशोत्सवादरम्यानचा (Ganeshotsav) एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. स्टेशनजवळ विराजमान झालेल्या गणपती पूजेवेळी लोकांच्या मनोरंजनासाठी बार डान्सरला बोलावण्यात आले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, व्हिडिओमधील बार डान्सर नुकत्याच एका नव्याने प्रदर्शित झालेल्या एका गाण्यावर थिरकताना दिसून येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे. नंदूरबार रेल्वेस्थानजवळ असलेल्या एका गणपती मंडळाने ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. दरम्यान बार डान्सरच्या छमछमवर रेल्वेचे काही कर्माचारी सुद्धा तिच्यासोबत डान्स करत होते.(नंदूरबार येथे गणपती विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या 6 जणांचा बुडून मृत्यू)
नन्दूरबार स्टेशन पर गणपति उत्सव के दौरान लोगों के मनोरंजन के लिए डांसर बुलाई गई है। @WesternRly @rpfwr1 @RailMinIndia @RailwaySeva @SP_WR_Vad @PiyushGoyal @PiyushGoyalOffc @drmbct @Srdcmbct12 @srdombct @SrDENCoBCT @rpfcrbb @rpfwrbct @mh39vish @rpfnandurbar @PatrikaSurat pic.twitter.com/jOAy9dVz1C
— Sanjeev Singh (@kikudear) September 8, 2019
तर काही वर्षांपूर्वी असाच प्रकार वसईमधील एका गणेश मंडळाकडून करण्यात आला होता. त्यावेळी बार डान्सरला बोलावून तिला बॉलिवूड आणि भोजपूरी गाण्यावर नाचण्यास सांगितले होते. तसेच बार डान्सरवर पैशांची सुद्धा उधळण केली जात होती. तसेच हैदराबाद येथेही बार डान्सरने ग्राहकासोबत डान्स करण्यास नकार दिल्याने तिला जबरदस्त मारहाण केली होती.