शेतकरी विजबील (Electricity Bill) भरत नाहीत, असा नेहमीच ठपका ठेवला जातो. मात्र, हे पूर्ण सत्य नाही. शेतकऱ्यांवरील ठपका नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तळोदा (Taloda) तालुक्यातील एका शेतकऱ्याने असा काही पुसला आहे की, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 15 लाख रुपये इतके विजबील भरत हा शेतकरी महावितरण थकबाकीतून मुक्त झाला आहे. राज्य शासन व महावितरणने (MSEDCL) कृषी वीज भरणा धोरणात दिलेल्या घसघशीत सवलतीचा फायदा घेत थकीत विजबीलातून मुक्तता मिळवली. दुसऱ्या बाजूला थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज न तोडण्याचा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आजच विधिमंडळात जाहीर केला. ज्यांची वीज तोडली आहे. ती जोडली जाईल, असेही म्हटले.
शेतकरी हाजी निसारअली शेरमोहम्मद मक्रानी यांच्या बाबत सांगायचे तर ते प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांना राज्य शासनाचा वसंतराव नाईक कृषिनिष्ठ पुरस्कारही मिळाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी असतानाही त्यांनी कोणतेही आडेवेडे न घेता एकूण रखमेचा धनादेशाद्वारे रोख भरणा केला. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही विजबील भरण्याची प्रेरणा मिळेल असे महावितरणच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याचे पुष्पहार देऊन स्वागत केले आहे. (हेही वाचा, Maharashtra Assembly Budget Session: पुढील 3 महिन्यांसाठी वीजतोडणीला तूर्तास स्थगिती; उर्जामंत्री नितिन राऊत यांची घोषणा)
मक्रानी हे तळोदा तालुका आणि दलेलपूर, प्रतापपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेती करतात. ते स्वत:च्या शेतीसह भाडेतत्वावरही शेती करतात. त्यामुळे एकूण शेतीसाठी त्यांनी एकूण 27 कृषिपंप जोडले आहे. सर्व कृषीपंप वापरात आहेत. सहाजिच महावितरणची वीजही तितकी खर्च होते. त्यामुळे बीलही येते. एकाच शेतकऱ्याकडे वीजबिलाची भलीमोठी रक्कम असल्याने ती वसुल करण्याचे महावितरणकडेही मोठे आव्हान असते. अशा वेळी मक्राणी हे वीजबील भरुन महावितरणला सहकार्य करतात.
दरम्यान, पाठिमागील काही काळात काही कारणांमुळे मक्रानी यांचे वीजबील थकले होते. महावितरणनेही पाठिमागील काही काळापासून विजबील भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी विविध योजनाही जाहीर केल्या आहेत. विजबील भरणा करण्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी अनेकदा बैठका घेतल्या. दरम्यान, तळोदा येथे लोकअदालत असल्याने महावितरणने न्यायालय परिसरातच कृषी वीजबिल मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात त्यांनी विजबील भरतो असे अश्वासन दिले आणि दुपारच्या वेळी कार्यालयात येऊन एकूण 20 वीजबिलांची 15 लाख 23 हजार 70 रुपयांची थकबाकी जमा केली.