भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी (Dhangar Community) घरे बांधण्याच्या योजनेचे नामकरण आता ‘अहिल्यादेवी होळकर आवास योजना’ (Ahilya Devi Holkar Awas Yojana) असे करण्यात आले आहे. यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री (Minister of Social Welfare) विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माहिती दिली आहे.
यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितलं की, अहिल्यादेवी होळकर या प्रजाहितदक्ष, दानशूर, कर्तृत्ववान, सुधारणावादी, कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. त्या युद्धकुशल, श्रेष्ठ मुत्सद्दी न्यायप्रिय शासकदेखील होत्या. त्यांनी अनेक घाट, विहिरी, मंदिरे, धर्मशाळा, पाणपोई यांची बांधणी केली. तसेच अन्नछत्राची उभारणी केली. (हेही वाचा -'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत 2020-21 साठी 1 हजार 306 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता)
भटक्या जमाती 'क' प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचे नामकरण. आता 'अहिल्यादेवी होळकर आवास योजना' असे योजनेचे नवे नाव- इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री @VijayWadettiwar यांची माहिती. pic.twitter.com/HC7dxebuyg
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2020
अहिल्यादेवी यांनी सर्वधर्मसमभावाची जपणूक करत स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी वस्त्रोद्योग, कुटिरोद्योगास चालना दिली. अहिल्यादेवी होळकर या सर्वच राज्यकर्त्यांच्या प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.