अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार आणि अपहरणाप्रकरणी नागपूर (Nagpur) मधील एका टिकटॉक स्टारला (Tiktok Star) अटक करण्यात आली आहे. समीर खान असे आरोपीचे नाव असून अपहरणादरम्यान शिवीगाळ आणि मारहार केल्याचा व्हिडिओ त्याने शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी समीर सह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. 18 जून रोजी घटलेल्या या घटनेचा व्हिडिओ तब्बल 15 दिवसांनी समोर आला.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी समीर खान आणि पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर समीरने या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मात्र छोट्याशा कारणामुळे समीर आणि पीडितेच वाद जाला. त्यानंतर रागाच्या भरात समीरने मो. शकिन आणि मो. सिद्धीकी या आपल्या मित्रांच्या साहाय्याने मुलीचे अपहरण केले. अपहरणावेळी समीरने मुलीला बळजबरीने दुचाकीवर बसवले. मारहाण आणि शिवीगाळ केली. या सगळ्याच व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. (लग्नावरून परतणाऱ्या 20 वर्षीय तरूणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल, एकास अटक)
या गंभीर प्रकाराची दखल घेत पाचपावली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिला विश्वासात घेऊन तिच्या तक्रारीच्या आधारे आरोपीवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरुन कोणाशीही मैत्री करताना किंवा कोणत्याही नात्यात अडकताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच काही विपरीत घडत असल्याची त्याची कल्पना पालक किंवा जवळच्या व्यक्तीला देणे. अथवा पोलिसांत तक्रार करणे, आवश्यक आहे. यामुळे अनर्थ टळू शकतो.