गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र कोरोना विषाणूच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेच्या तोंडावर उभा असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र आता कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात आल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने उप-राजधानी नागपुरात (Nagpur) पाऊल ठेवले असून, ती नागपूर मार्गे महाराष्ट्रात वेगाने पसरू शकते अशी भीती आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे, नागपुरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
नितीन राऊत हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. नागपुरात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे त्यांनी स्वतः काबुल केले आहे. अशा स्थितीत हा संसर्ग वाढण्यापासून रोखणे अतिशय गरजेचे असल्याने, 3-4 दिवसांत नागपुरात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या परत दोन आकडी झाली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.
आज हम बहुत दिनों बाद दोगुने पॉजिटिव मामलों पर आ गए हैं। हमारे यहां तीसरी वेव का आगमन हो गया है। जल्द ही आपदा प्रबंधन की बैठक होगी। कुछ निर्बंध लगाने का फैसला हुआ है लेकिन इसके संबंध में जनता के प्रतिनिधियों के साथ चर्चा करके अंतिम फैसला लेंगे: नीतिन राउत, महाराष्ट्र के मंत्री pic.twitter.com/Ef98bBBG8N
— ANI_HindiNews (@AHindinews) September 6, 2021
नितीन राऊत म्हणाले की, परिस्थिती पाहता नागपुरात कमीत कमी वीकेंड लॉकडाऊन लागू करणे आवश्यक झाले आहे. यासाठी पुढील 3-4 दिवस परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे. या दरम्यान ते व्यापारी, दुकानदार आणि विविध क्षेत्रांतील लोकांसोबत बोलत आहेत, चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते माध्यमांशीही बोलणार आहे. प्रत्येकाचे मत जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल. (हेही वाचा: चाकरमान्यांसाठी ठाकरे सरकराचं मोठं गिफ्ट; गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेसवे वर टोलमाफी)
परंतु येत्या तीन-चार दिवसांत निर्णय होणे निश्चित आहे. अशा परिस्थितीत, आठवड्याच्या दिवशी, पुन्हा एकदा सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत रेस्टॉरंट उघडे ठेवण्याचा आदेश येऊ शकतो. दुकानांची अंतिम मुदत देखील कमी केली जाऊ शकते आणि आठवड्याच्या शेवटी संपूर्ण लॉकडाऊनचा विचार केला जात आहे. नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊन लागू करण्याविषयी भाष्य केले.