Ganeshotsav 2021: चाकरमान्यांसाठी ठाकरे सरकराचं मोठं गिफ्ट; गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेसवे वर टोलमाफी

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सवात मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्यात आल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Ganeshotsav 2021: चाकरमान्यांसाठी ठाकरे सरकराचं मोठं गिफ्ट; गणेशोत्सवानिमित्त मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेसवे वर टोलमाफी
Toll Plaza | Image used for representational purpose only. | (Photo Credits: Wikimedia )Commons

Toll waiver for Ganpati at Expressway: दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. गणेशोत्सवात मुंबई-गोवा (Mumbai-Goa), पुणे एक्सप्रेसवे (Pune Expressway) वर टोल माफ (Toll Free) करण्यात आल्याची घोषणा राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. चारमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही टोलमाफी गणपती आगमनाच्या दोन दिवसआधी आणि विसर्जनानंतर दोन दिवस असेल. टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांची नोंद करावी लागेल. त्यानंतर टोलमाफीचे स्टिकर पुरवले जातील.

मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे ने कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर खास नियोजन असणार आहे. खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस अशा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीनंतर टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाला अवघे 4 दिवस उरलेले असल्यामुळे चाकरमान्यांनी कोकणात जाण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी टोल नाक्यांवर वाहनांची रांग लागलेली लागते. मात्र टोलमाफीच्या निर्णयामुळे ही गैरसोय टाळता येणार आहे. (Ganeshotsav 2021: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना 'या' नियमांचे पालन करावे लागणार)

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासियांसाठी आनंदाची पर्वणी. यासाठी लाखो संख्येने चाकरमानी कोकणात जातात. यांच्यासाठी विशेष रेल्वे, बसेसची सोय दरवर्षी करण्यात येते. यंदाही ती करण्यात आली आहे. मात्र कोविड-19 संकटामुळे काही विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मागील वर्षी निर्बंध अधिक कठोर होते. त्यामुळे अनेकांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नाही. परंतु, यंदा गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा आनंद चाकरमानी घेऊ शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2021 06:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).