नागपूर: मसाजसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्या पैशांच्या बाबत नागरिकांची विविध मार्गाने फसवणूक केली जात असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या प्रकारांवर चाप बसण्यासाठी पोलिसांकडून वारंवार प्रयत्न केले जात असले तरीही हे गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. याच पार्श्वभुमीवर नागपूर मधील एका तरुणाला ऑनलाईन पद्धतीने मसाजचे पैसे भरणे महागात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदर तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. फोनवरुन एका मसाजगर्लने त्याची फसवणूक केल्याचे तरुणाने तक्रारीत सांगितले आहे.

नागपूरातील पोलीस स्थानकाच्या परिसरातच हा प्रकार घडला आहे. एका तरुणाने मसाज करण्यासाठी एका एस्कॉर्ट सर्विसवरुन एका तरुणीची निवड केली. त्याखाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर सुद्धा तरुणाने फोन केला असता त्याला तरुणीने ऑनलाईन बुकिंग चार्जेस म्हणून 3 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यावर तरुणीने एका तासात घरी मसाजसाठी येते असे सांगत फोन ठेवला. परंतु खुप वेळ झाला तरीही मसाजगर्ल काही घरी आलीच नाही. त्यामुळे तरुणाने पुन्हा त्या तरुणीला फोन केला असता तिने अश्लील चाळे करशील असे म्हणत रिस्क अमाउंटच्या नावाखाली अजून 2 हजार रुपये उकळण्याच तरुणीचा डाव होता.(मुंबई: 5 रुपयांसाठी रिक्षाचालकाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून हत्या 

परंतु तरुणाने मसाजच्या नावाखाली आपली फसवणूक होत नाही आहे ना याचा विचार न करता तिला पाठवण्याचा विचार केला. मात्र आपली फसवणूक होत असल्याची शंका वाटू लागल्याने तरुणाने मसाजगर्लच्या विरोधात तातडीने पोलिसात धाव घेतली. या तरुणाच्या साक्षीने आरोपी तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जात आहे.