Nagpur news: अमेरिकेची कंपनी नागपूरच्या वेदांत देवकाटे याच्या प्रेमात, परत घेतली 33 लाख रुपयांची ऑफर; काय घडले नेमके? घ्या जाणून
Coding Representative Image (Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) येथील राहणारा 15 वर्षीय वेदांत देवकाटे (Vedanta Devkate). या अवघ्या 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात एक अमेरिकी कंपनी (US Company) पडली. वेंदात याचे ज्ञान पाहून ही कंपनी इतकी प्रभावीत झाली की, या कंपनीने वेदांत याला चक्क 33 लाख रुपयांची ऑफर दिली. पण, गंमत अशी की या मुलाचे वय पाहून कंपनीने आपली ऑफर नाईलाजाने मागे घेतली. वेंदात यांने इन्स्टाग्राम ब्राऊज करताना एक लिंक मिळाली. यात त्याला वेबसाईट डेव्हलपमेंटची एक स्पर्धा दिसली. त्याने या लिंकवर क्लिक केले. तो या स्पर्धेत सहभागीही झाला. वेदांत याने दोन दिवसांमध्ये कोडची 2,066 लाइन्स लिहिल्या. ज्यामुळे त्याला कंपनीकडून नोकरीची ऑफर आली. त्याचे वार्षीक पॅकेज होते 33 लाख रुपये.

कंपनीने वेदांतला नोकरी तर ऑफर केली. पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला जेव्हा कागदपत्रे मागण्यात आली तेव्हा मात्र अडचण निर्माण झाली. वेंदांतचे वय फारच कमी म्हणजे 15 वर्षे होते. नोकरीसाठीचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असायला हवे. त्यामुळे वय चांगल्या नोकरीच्या आड आले. वेदांत याचे वय कळताच कंपनीने आपली ऑफर मागे घेतली. (हेही वाचा, संशोधकांनी विकसित केलेला नवीन N95 फेस मास्क जो COVID-19 व्हायरसपासून करेल संरक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूजर्सी येथील जाहिरात कंपनीने वेदांत याला आपल्या एचआरडी टीममध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली. त्याचे काम होते इतर कोडर्स मॅनेज करणे आणि त्यांना काम देणे. परंतू, कंपनीला कळले की, आपण ज्याला नोकरी देतो आहोत त्याचे वय केवळ 15 वर्षे आहे. त्यामुळे कंपनीने आपले ऑफर लेटर परत घेतले. त्याची जगभरातील 1000 स्पर्धकांमधून निवड झाली होती.

दरम्यान, कंपनीने आपले ऑफर लेटर परत घेत वेदांत याला सल्ला दिला की, त्याने आपले पुढील शिक्षण पूर्ण करावे. त्यानंतर आम्हाला नोकरीसाठी संपर्क करावा. कंपनीने म्हटले आहे की, आम्हाला आपला अनुभव, व्यावसायिक दृष्टीकोण आणि विचार खूप आवडले. आम्ही प्रभावित झालो. टीमने आपले प्रेजेंटेशन एन्जॉय केले. आमच्या रणनितीत आपण एक महत्त्वाचा दृष्टीकोण दिला. वेदांत याने या आधी अनेक वेबसाईट तयार केल्या आहेत.

उल्लेखनिय असे की, वेदांत याने आपली animeeditor.com नावाची स्वत:चीही एक वेबसाईट बनवली आहे. जी लोकांना यू्ट्यूब सारखे व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देते. या वेबसाईटमध्ये ब्लॉग, व्लॉग्स, चॅटबॉट आणि व्हिडिओ असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म पाहायला मिळतात. वेदांत याने सांगितले की, ही वेबसाईट बनविण्यासाठी त्याने एचटीएमएल आणि जावा स्क्रिप्ट भाषा व्हर्च्युअल स्टूडिओ कोड (2022) वापरले आहे.