Crime Image File

Nagpur Crime: नोकरीचं आमिष दाखवून तब्बल 111 जणांकडून पैसे लुबाडल्याचे समोर आले आहे. नासा सारख्या नामांकित संस्थेचा नाव वापरून तरुणांची फसवणूक केली आहे. ओमकार तलमले असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. नागपुरमधून आरोपी ओमकारने 111 जणांकडून तब्बल 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपये लुबाडले आहेत. धक्कादायक म्हणजे फसवणूकी दरम्यान त्यांने दोन व्यापारांची हत्या केली आहे. सध्या ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे.

एक आठवड्यापूर्वी काही गुंड्याच्या मदतीने ओमकारने या दोन व्यापारांची हत्या केली.  आधी दोघांचं अपहरण केलं नंतर त्यांची हत्या कोंढाली जवळ हत्या केली. दोघांचे मृतदेह वर्धा नदीत फेकून दिले,  एकीकडे तरुणांनी पोलीसांकडे फसवणूकीचा तक्रार केली.  त्यामुळे हा प्रकार सर्वां समोर उघडकीस आला. नोकरीचं आमिष दाखवत त्याने अनेकांना लुबाडलं. ओमकारने अनेक तरुणांना खोटं अपॉइंटमेंट लेटरही पाठवलं होतं. नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार तलमले याने २०१७ पासून नासामध्ये नासामध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत असल्याचे  खोटी फसवणूक सांगितली. तरुणांशी मैत्री करुन नासा आणि इस्रो सारख्या संस्थांमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं. त्यांच्या कडून टप्प्याटप्प्याने लाखो रुपये लुबाडलं. ओमकार ने अनेक तरुणांना नासाच्या खोट्या लेटर पॅडवर अपॉइंटमेंट लेटर ही पाठवले होते. लवकरच नागपूर शहर पोलीस फसवणुकीच्या या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहे आणि त्यानंतर फसवणुकीच्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे.ओंकार तलमले हत्येच्या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे.