Nagpur: मैत्रिणीला Friend Request पाठवणे तरुणाला पडले महागात, 5 जणांकडून हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील नागपूरात मैत्रीणीला फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवल्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. तसेच आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या व्यतरिक्त पोलिसांकडून हत्येत आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा सुद्धा तपास करत आहेत.(Nagpur: पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपूर येथे एकाची आत्महत्या, गुन्हे शाखा करणार तपास)

असे सांगितले जात आहे की, फ्रेंडशिप डे च्या दिवशी एका व्यक्तीने आपल्या मैत्रीणीला फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवली. त्यामुळे नाराज झालेल्या मुलांनी त्याला धमकावले आणि मारहाण सुद्धा केली. मात्र तीन दिवसानंतर म्हणजेच 4 ऑगस्टला हा वाद आणखी चिघळला गेला. या दरम्यान मुलांनी व्यक्तीवर चाकू हल्ला करत त्याची हत्या केली. पण त्याचा मृतदेह सुद्धा झाडाझुडपांमध्ये फेकून देत घटनास्थळावरुन पळ काढला.

नागपूर मधील नंदनवन येथील पोलीस अधिकाऱ्यांनी हत्येप्रकरणी तपास सुरु केला आहे. अतिरिक्त सीपी सुनील फुलारी यांनी असे म्हटले की, या हत्येप्रकरणी पोलिसांना काही महत्वाच्या गोष्टी मिळाल्या आहेत. 5 जणांचा ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच घटनास्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासून पाहत आहेत.

तसेच ठाणे येथे नवऱ्याची हत्या केल्याने बायको, तिचा प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नारपोली ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक मालोजी शिंदे यांनी असे म्हटले की, महिलेच्या नवऱ्याचा मृतदेह 1 ऑगस्ट रोजी भिवंडी शहरातील मनकोली नाका येथील एका कॅबमध्ये मिळाला. त्यानंतर पोलिसांनी कलम 302,201 आणि 34 अंतर्गत अज्ञात व्यक्तिंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Aurangabad: मृत समजून स्मशानात चालू होते आजीबाईंवर अंत्यसंस्कार; सरणावरच झाल्या जिवंत)

पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत असे म्हटले की, महिलेचा पती एका फॅक्ट्रीमध्ये काम करत होता. मात्र कोरोनामुळे त्याची नोकरी गेली. त्यामुळे तो पुन्हा कॅब चालवू लागला होता. नवरा आणि बायको या दोघांचे सुद्धा विवाहबाह्य संबंध होते. महिला आपल्या नवऱ्याकडे घटस्फोट मागणार होती. मात्र त्याने तिला तिच्या प्रेम संबंधामुळे नकार दिला. याच कारणामुळे महिलेने आपला प्रियकर आणि एका मित्रासह नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. नवऱ्याच्या हत्येचे काम दोन जणांना सांगितले.