Nagpur Graduate Constituency Election 2020: नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कोणाला? अनिल सोले की संदीप जोशी?
BJP | (File Image)

नागपूर पदवीधर मतदारसंघातून (Nagpur Graduate Constituency) भाजप (BJP) यावेळी कोणाला उमेदवारी देणार याबाबत पक्षाच्या कार्यर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. इच्छुक अनेक असले तरी काही मोजकी नावे चर्चेत आहेत. त्यात आमदार अनिल सोले (Anil Sole), महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) ही दोन नावे अधिक आघाडीवर आहेत. भाजपकडून मात्र अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब सोडा संकेतही मिळाले नाहीत. त्यामुधे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्ता आहे. त्यात दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते मात्र आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार असे ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत चुरस वाढली आहे.

अनिल सोले यांच्याबाबत बोलायचे तर ते नागपूर पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडूण आले आहेत. सध्या त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. एकाच कार्यकर्त्याला दोन वेळा संधी मिळाली आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षाने आता विचार करावा आणि नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी भाजपचे नव्या दमाचे युवा कार्यकर्ते करताना दिसत आहेत. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त आमदार? काँग्रेस पक्षाकडून संधी मिळण्याची शक्यता)

दुसऱ्या बाजूला संदीप जोशी यांच्याबाबत सांगायचे तर ते नागपूरचे विद्यमान महापौर आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच यापुढे महापालिका निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे. महापौर असलेली व्यक्ती पक्ष अथवा पक्षातील बड्या नेत्याने संकेत दिल्याशिवाय अशी घोषणा करणे अपवादानेच शक्य आहे. अपवाद म्हणावा तर संदीप जोशी यांच्याबाबतचा अशी घोषणा करण्याबाबतचा अपवाद अद्याप तरी पुढे आला नाही. त्यामुळे आता संदीप जोशी यांचे कार्यकर्ते दावा करत आहेत की पक्षाने त्यांना संकेत दिल्यानेच त्यांनी महापालिका निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे.

आमदार अनिल सोले आणि महापौर संदीप जोशी यांचे कार्यकर्ते मात्र जोमाने कामाला लागले आहेत. पक्षाने अद्यापही कोणाचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे पक्ष आता कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतो आणि कोणाच्या नावाची घोषणा करतो याबाबत उत्सुकता आहे.