फेसबुक (Photo Credits: ANI)

Nagpur: सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या अनोखळी व्यक्तीसोबत मैत्री करताना जरा जपूनच रहावे असे वेळोवेळी सांगितले जाते. तरीही काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि फसतात. अशाच पद्धतीचा एक प्रकार नागपूर येथून उघडकीस आला आहे. तर एका 66 वर्षीय वृद्धाने फेसबुक वरुन लंडन मधील एका तरुणीशी मैत्री केली. परंतु त्याची या मैत्रित फसवणूक झाली असून त्याला 10 लाखांना तिने गंडवले आहे.(मुंबई: पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला गेस्टचा विनयभंग, 22 वर्षीय कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल)

लिडा थॉमसन या तरुणीशी वृद्धाची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. या दोघांमध्ये मैत्री झाली असता ते नेहमी एकमेकांशी बोलायचे. लिडा हिने वृद्धाला लंडन येथील प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो पाठवत त्याला भुरळ घातली. पण लॉकडाऊनच्या काळात लिडा हिने मी भारतात येणार असून तिच्याकडील कोटी रुपयांचे भारतात सेवा कार्य करायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी वृद्धाने लिडा हिला तिच्या या गोष्टीसाठी होकार दिला.

तर काही दिवसांनी लिडा हिने वृद्धाला फोन करुन ती दिल्लीतील विमानतळावर अडकली असून तिला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे तिने त्याला सांगितले. तर तिच्याकडील 2 कोटी रुपये असल्याने तिला कस्टम अधिकाऱ्यांनी 10 लाख रुपये कस्टम ड्युटी भरावी लागेल त्याशिवाय जाऊ देणार नाही असे म्हटले. तसेच लिडा हिने खोट्या विमानसेवा अधिकारी आणि कस्टम अधिकाऱ्यांशी वृद्धाचे बोलणे सुद्धा करुन दिले. त्यावेळी वृद्धाने कोणताही विचार न करता मैत्रीत मदत करण्याच्या नादात 9 लाख 66 हजार रुपये लिडा हिच्या बँकेत पाठवून दिले. या सर्व प्रकारानंतर लिडा हिचा पत्ताच लागला नाही.(Mumbai: कुलाबा येथील मुलीला इन्स्टाग्रामवरील मित्रासोबत मैत्री करणे पडले महागात, घरातून पैशांसह दागिन्यांची केली चोरी)

दरम्यान, लिडा हिच्याकडून काहीच फोन किंवा मेसेज खुप दिवस न आल्याने वृद्धाला आपली फसवणूक झाल्याचे कळले. त्यानंतर वृद्धाने पोलिसात तक्रार दाखल केली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तसेच महिला ही लंडन येथून नव्हे तर दिल्लीतूनच बोलत असल्याचे समोर आले. महिलेच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.