मुंबई: पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला गेस्टचा विनयभंग, 22 वर्षीय कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

हॉटेलमधील हाऊस किपिंगचे काम करणा-या एका 22 वर्षीय कर्मचा-याने तेथे आलेल्या महिला गेस्टचा विनयभंग (Woman Molestation) केल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई: पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला गेस्टचा विनयभंग, 22 वर्षीय कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Newsplate)

मुंबईतील (Mumbai) एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Five Star Hotel) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉटेलमधील हाऊस किपिंगचे काम करणा-या एका 22 वर्षीय कर्मचा-याने तेथे आलेल्या महिला गेस्टचा विनयभंग (Woman Molestation) केल्याची घटना समोर आली आहे. PTI ने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेसोबत या कर्मचा-याने या हॉटेलच्या 37 व्या मजल्यावर असलेल्या वॉशरुमध्ये विनयभंग केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला या पंचतारांकित हॉटेलमध्ये वेबसीरिजचे शूटिंग करत होती. शूटिंग संपल्यानंतर ती ड्रेस बदलण्यासाठी चेंजिंग रुममध्ये गेली. ती कपडे बदलत असताना आरोपी दिलेश्वर महंत याने तिला पकडले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर तिने आरडाओरडा करण्यापासून रोखण्यासाठी तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या पीडित महिलेने कसेबसे करुन स्वत:ला वाचवून तिथून पळ काढला आणि वॉशरूमधून बाहेर आली. त्यानंतर तिने हॉटेलमधील अलार्म वाजवून लोकांना जमा केले. हेदेखील वाचा- Mumbai shocker! पाच मुल असणाऱ्या बापाने 5 वर्षीय मुलाचे कपडे काढून केले लैंगिक शोषण, सुनावली 10 वर्षांची शिक्षा

या पीडित महिलेने एन एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी महंतवर IPC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे. या घटनेने पंचतारांकित हॉटेलमधील महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या हॉटेलमधील व्यवस्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस या सर्व गोष्टींचा शोध लावत आहेत.

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली. 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 नराधमांना अटक केली आहे. नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2021 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).