मुंबईत एका विशेष POCSCO कोर्टाने शुक्रवारी 58 वर्षीय व्यक्तीने 2018 मध्ये पाच वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पाच मुलांचा बाप असणारा व्यक्ती त्या 5 वर्षाच्या मुलाच्या परिसरात चिकनची विक्री करत होता. 4 एप्रिल 2018 मध्ये जेव्हा तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता त्यावेळी त्याला 2 रुपये या व्यक्तीने दिले आणि आपल्या घरी घेऊन आला. मुलाला घरी आणल्यानंतर त्याने त्याचे कपडे काढून त्याच्या समोर मास्टरबेशन केल्याचे सांगण्यात आले आहे.(Yavatmal: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; यवतमाळ येथील घटना)
मुलासोबत हा प्रकार झाल्यानंतर तो घरी आला आणि त्याने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलाच्या आईने त्या चिकन विक्रेत्याला याबद्दल विचारणा केली. टाइम्स ऑफ इंडिया यांच्या एका रिपोर्ट्स नुसार, आरोपीने मुलाच्या आईला मला माफ करा असे म्हटले आणि त्या मुलात भूत असल्याचे त्या व्यक्तीने म्हटले.(जळगाव: मोबाइलमध्ये मृत्यू कधी आणि कसा होणार हे पाहून 8 वी मधील विद्यार्थ्याची आत्महत्या)
त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात चिकन विक्रेत्यावर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. POCSO कायद्यामधील कलम 6 अंतर्गत आरोपील आयुष्यभर तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी कोर्टाने पाहिले की, पेनीट्रेशन न झाल्याने आरोपीला 10 वर्षाचा तुरुंगास सुनावला आहे.