Nagpur: रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड करत डॉक्टरांवर केला हल्ला (Video)
Death (Photo Credits-Facebook)

Nagpur: नागपूर येथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड केली आणि त्याचसोबत डॉक्टरांवर सुद्धा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सदर घटना नागपूरातील मानकापूर येथील कृणाल रुग्णालयात घडली आहे.(ठाणे: भिवंडी मध्ये वीटभट्टी मजुराच्या घरावर कोसळला ट्रक; 3 चिमुकलींचा मृत्यू)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाची तोडफोड केली आणि डॉक्टरांवर हल्ला सुद्धा केला. तर ज्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हा गोंधळ ज्या ठिकाणी घातला तेथेच बाजूला एका वृद्धावर ही उपचार करण्यात येत होते. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. तसेच अद्याप या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.(Nashik Shocker: नाशिक मध्ये महापालिका महिला वैद्यकीय अधिकार्‍याचा पेटलेल्या गाडीत आढळला जळलेल्या अवस्थेत मृतदेह)

दरम्यान, कोविड19 च्या काळात अशा प्रकारच्या घटना अधिक घडल्या आहेत. काहींनी रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून तर काहींनी रुग्णालयाच्या अधिक बिलावरुन तोडफोड केल्याचे दिसून आले आहे. तर राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.