नाशिक (Nashik) मध्ये एका महापालिका महिला वैद्यकीय अधिकार्याचा पेटलेल्या गाडीत जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. नाशिक मध्ये वाडीवर्हे भागामध्ये एका जळलेल्या वाहनामध्ये मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी तिथे धाव घेत तपास सुरू केला आहे.
मृत महिलेचं नाव डॉ. सुवर्णा वाझे जाधव आहे. या आरोग्य विभागामध्ये कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर काम करत होत्या. हा घातपात होता अपघात याचा तपास सध्या सुरू आहे. डॉ. सुवर्णा वाझे-जाधव या मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तेव्हा मंगळवारी (25 जानेवारी) रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. यामध्ये त्यांचं शरीरही जळलेल्या अवस्थेत सापडलं. हे देखील नक्की वाचा: Maharashtra: नाशिक येथील व्यक्तीने दारुच्या नशेत केली 60 वर्षीय आईची हत्या, पोलिसांकडून अटक .
मीडीया रिपोर्ट्सनुसार सुवर्णा यांच्या पतीच्या फोनवर त्यांना मंगळवारी रात्री एक मिटींग असल्याने उशिर होणार असल्याचा मेसेज आला होता. पण प्रत्यक्षात अशीच कोणतीच मिटींग नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता त्याच्या मृत्यूवर घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कोणतीही बैठक नसताना पतींना मेसेज कसा आला? त्यांच्यासोबत कोण होते, शेवटी त्या कोणाला भेटल्या आणि त्यांचा मृत्यू कसा झाला असे प्रश्न आता उभे ठाकले आहेत.