Sexual Crime | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Sexual Assault Crime: भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणार घटना पुढे आली आहे. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आलेल्या चुलत बहिणीवर चुलत भावाने लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर पुढचे प्रदीर्घ काळ या प्रकाराची कोणालाही कानोकान खबर नव्हती. मात्र, पीडितेच्या पोटात अचानक एक दिवस दुखू लागले. पोटदुखीच्या त्रासासाठी कुटुंबीयांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत पीडिता गर्भवती असल्याची माहिती पुढे आली आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच घसरली. कुटुंबीयांनी पिडीतेला विश्वासत घेऊन विचारले असता तिने चुलतभावाने आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. नागपूर (Nagpur) येथे ही घटना घडली.

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलगा महेश्वर (वय २७ वर्ष) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडिता इयत्ता आकरावीत शिकते. तर आरपी हा तिच्या काकाचा मुलगा असून तो वाणिज्य शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. आरोपी इयत्ता दहावीपासून पीडितेला अभ्यासात मदत करतो. त्यामुळे तिचे आरोपीकडे जाणेयेणे होते. आरोपीने या आधीही एकाद तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिला वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलावले होते. कुटुंबीयांसह मध्यरात्री वाढदिवसाचा केक कापला. त्यानंरत आरोपीने पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले. त्यातून पीडिता गर्भवती राहिली. (हेही वाचा, Missing Love, Beed Crime: प्रेमभंग झाल्याने व्याकूळ तरुणाचा लग्नात मोडता, 'मिसींग लव्ह' म्हणत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; आरोपीला अटक)

आरोपी माहेश्वर याची सुरुवातीपासूनच पीडितेवर नजर होती. त्यामुळे तो तिला सातत्याने जबदस्ती करायचा. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगायचा. पण, आपण बाहू-बहीण आहोत. त्यामुळे असे काही करुया नको, असे पीडिता त्याला वारंवार सांगायची. दूरही ठेवायची. पण, आरोपी आपल्या निश्चयावर ठाम होता. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. त्याने तिच्याकडे अनेकदा शरीरसुखाची मागणीही केली होती. परंतू, पीडितेन त्याला दाद दिली नव्हती. मात्र, वाढदिवसाचे निमित्त साधून आरोपीने घात केलाच. पीडितेवर अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.