Breakup | (Image Credit - Pixabay)

Beed Crime: एकतर्फी प्रेमात आलेल्या नैराश्येतून एका तरुणाने चक्क कथीत प्रेयसीच्या लग्नात मोडता घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना बीड जिल्ह्यात घडला. आरोपी तरुणाचे बीड (Beed ) जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या एका मुलीशी मैत्री होती. दोघेही एकमेकांशी संपर्कात होते. त्यातून त्यांनी काही फोटोही एकत्र काढले होते. दरम्यान, तरुणीचे लग्न ठरले. लग्नाचा मुहूर्तही निघाला. तरुणीचे लग्न ठरल्याचे समजताच तरुण नैराश्येत गेला. तरुणीच्या एकतर्फी प्रेमात असलेल्या आरोपीने सदर तरुणीचे एकत्र काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यावर 'मिसींग लव्ह' (Missing Love) असेही लिहीले. दरम्यान, घडल्या प्रकाराची माहिती तरुणीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

नववधू असलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद करत तरुणाला ताब्यात घेतले. आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात असल्याचे तरुणीचे लग्न लागले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या नातेवाइकांना बोलावून त्यांचे मनपरिवर्तन केले. त्यामुळे एक तरुणी बोहल्यावर चढली. प्राप्त माहितीनुसार आरोपी, लातूरचा आहे. तरुणी आणि आरोपी यांची काही कारणांनी ओळख झाली होती. त्यातून तो तिला भेटण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन बीडला यायचा. त्यांच्यातील संपर्क पुढे अधिक दृढ झाला. त्यांनी एकत्र फोटोही काढले. दरम्यान, तरुणीचे लग्न ठरले. लग्नाची तारीख 30 मे ठरली. मुलीचे लग्न ठरल्याचे कळताच आरपीने मुलीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच फोटोसोबत 'मिसिंग लव्ह' अशा ओळीही लिहिल्या. (हेही वाचा, तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये वाटले; मुंबई येथे 'लिव्ह-इन-रिलेशनशिप' पार्टनरसोबत धक्कादायक कृत्य (Watch Video) )

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन दिवसभर बसवून ठेवले. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत पुढे आले की, आरोपी काही नातेवाईकांच्या मदतीने तरुणीच्या लग्नात धिंगाना करायचा विचार करत होते. त्यांनी तसा कटही रचला होता. त्यासाठी दोन वाहनेही तयार ठेवण्यात आली होती. मात्र, सायबर पोलिसांनी तपास करत आरोपीचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपीचा कट उधळला गेला. पलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे तरुणीचा विवाह सुरळीत पार पडला.