Mira Road Crime News: मुंबई. मायानगरी. अनेकांच्या हाताला काम आणि स्वप्नांना आकार देणारे शहर. न झोपणारं शहर, अशीही मुंबईची ओळख. याच मायानगरी मुंबईत हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील मिरा रोड (Mira Road) परिसरात 'लिव्ह इन रिलेशनशिप' (Live in Relationship) मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या झाली आहे. पीडिता 32 तर आरोपी 52 वर्षांचा गृहस्थ आहे. ही हत्या साधीसुधी नाही. मानवी मनाला हादरवून टाकणारी आहे. आरोपीने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केली. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने तिच्या शरीराचे बारीक तुकडे केले. ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी हे तुकडे प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीत भरे आणि बाईकवरुन ही पिशवी इमारतीच्या मागे असलेल्या जागेत नेऊन टाकत असे.
अंगावर शहारा आणणारी अशी ही धक्कादायक घटना इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमुळे उघडकीस आली. इमारतीच्या एका सदनिकेतून अतिशय दुर्गंधी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. रहिवाशांनी दिलेल्या माहितीवरुन पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुर्घंधी येणारी सदनिका उघडली असता धक्कादायक घटना पुढे आली. पोलिसांना घरामध्ये मृतदेहाचे तुकडे आणि अर्धवट मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोज साने असे आरोपीचे नाव आहे. तो 56 वर्षांचा आहे. तर सरस्वती वैद्य असे मृत महिलेचे नाव आहे. मीरा भाईंदर उड्डाणपूलानजिक असलेल्या गीता नगर येथे गीता आकाशदीप नावाच्या सोसायटीत फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये दोघंही प्रदीर्घ काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असत. हत्येचे नेमके कारण पुढे आले नाहीत. पोलीस आरोपी मनोज साने याच्याकडे चौकशी करत आहेत. लवकरच हत्येचे कारणही पुढे येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मनोज साने याच्यावर नयानगर पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ
VIDEO | The body of a 36-year-old woman, chopped into several pieces, was found in a flat on the seventh floor of a building in the Mira-Bhayandar area of Thane district on Wednesday night. The woman's live-in partner is the prime suspect in the case, who is yet to be arrested. pic.twitter.com/0vH4CBWjT3
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीमध्ये म्हटले आहे की, आरोपने मृतदेहाचे तुकडे कटर मशीनच्या मदतीने केले असल्याची माहिती दिली. त्यांतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचाही वापर केला. दरम्यान, पोलिसांना मिळालेला मृतदेह साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी हत्या झालेला असावा असा अंदाज आहे. वैद्यकीय अहवलात बऱ्याच गोष्टी पुढे येतील असे पोलिसांनी म्हटले आहे.