Nagpur Suicide: सासरच्या छळाला कंटाळून नातीसह सूनेची तलावात उडी घेऊन आत्महत्या; नागपूर येथील धक्कादायक घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

A Woman Along With Daughter Dies By Suicide: सासरच्या जाचाला वैतागून एका महिलेने आपल्या मुलीसह तलवात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेने आजुबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेची सासू आणि तिचा दिर तिला नेहमी मानसिक आणि शाररिक त्राय द्यायचे. यामुळे या महिलेने आपल्या दोन मुलींसह अंबाझरी तलावात उडी मारून आपले जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. मात्र, एनवेळी आत्महत्येचा विचार त्यागल्याने या महिलेच्या थोरल्या मुलाचा जीव वाचला आहे. परंतु, दुर्देवाने महिला आणि तिच्या धाकट्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

सविता राजू खंगार (वय, 45) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर, या महिलेच्या थोरल्या मुलीचे नाव श्र्वेतल (वय, 22) आहे. तर, रुचिता (वय, 20) ही धाकटी मुलगी आहे. सविता ही वाठोडामधील विद्या नगरातील रहिवाशी आहे. मात्र, तिचा पती कामावर निघून गेल्यानंतर तिची सासू आणि दिर तिला शाररिक आणि मानसिक छळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी घरातील पंखा दुरुस्ती करण्याच्या मुद्द्यावरून सविता आणि तिच्या दिरात वाद झाला होता. त्यावेळी तिच्या दिराने अश्लील शिवीगाळ करत तिला मारहाणदेखील केली होती. त्यानंतर सविता आपल्या दोन्ही मुलींसह घराबाहेर पडली आणि घरापासून 15 किलोमीटर असलेल्या अंबाझरी तलावाजवळ जाऊन बसल्या. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत तिथे बसल्यानंतर त्यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सविता आणि रचिताने तलावात उडी घेत आपले जीवन संपवले. मात्र, एनवेळी आत्महत्येचा विचार त्यागल्याने श्र्वेतलचा जीव वाचला आहे, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Pune Suicide: लग्नाला नकार दिला म्हणून एका विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल

त्यानंतर श्र्वेतलने फोन करून आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात कळवले. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री शुक्रवारी अग्निशमनदलाच्या जवानांनी सविता आणि रुचिताचे मृत शरीर तलावाबाहेर काढले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.