Pune Suicide: लग्नाला नकार दिला म्हणून एका विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल

प्रेमात धोका मिळाला म्ह णून एका 28 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील चाकण (Chakan) परिसरात 22 सप्टेंबर रोजी घडली होती.

Pune Suicide: लग्नाला नकार दिला म्हणून एका विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

प्रेमात धोका मिळाला म्हणून एका 28 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील चाकण (Chakan) परिसरात 22 सप्टेंबर रोजी घडली होती. आत्महत्येपूर्वी मृत महिलेने  प्रियकराला एक मॅसेज केला असून त्यात “माझ्यासोबत प्रेमाचे नाटक केले, मी आत्महत्या करत आहे”, असे म्हटले आहे. जवळपास एक महिन्यानंतर महिलेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. या घटनेने संपूर्ण चाकण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबधित महिला विवाहित असून तिने पाच वर्षे संसार करून पती सोबत पटत नसल्याने घटस्पोट घेतला होता. त्यानंतर ही महिला आपल्या आई वडीलांच्या सोबत न राहता स्वतंत्र राहत होती. तसेच एका खाजगी कंपनीत काम करून ती स्वतःचा उदरनिर्वाह भागवत होती. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी या महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी तिने आपल्या प्रियकराला एक मॅसेज केला होता. ज्यात तिने म्हटले होते की, तू माझ्यासोबत प्रेमाचे नाटक केले आहेस. यूव्हर टाईम इज ओव्हर...आय एम डूईंग सुसाईड बाय बाय! या मॅसेजनंतर तिने आत्महत्या केली आहे, अशी महिती एका मराठी बेवसाईटने दिली आहे. हे देखील वाचा-मुंबई: धक्कादायक! 25 वर्षीय Drug Addict नातवाने उडवले आजीचे मुंडके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे एका तरूणाशी प्रेम संबध होते. तसेच त्यांना लग्नदेखील करायचे होते. मात्र, आरोपीने लग्नास नकार दिल्यामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी तरुणावर आत्महत्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश धस हे अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2020 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).