मुंबई: वांद्रे येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचे तिच्या 25 वर्षीय नातवाने आपल्याच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ख्रिस्तोफर डायस असे तरुणाचे नाव असून त्याने आजीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीचे तुकडे घरभर फेकून दिले होते. या सर्व प्रकारानंतर ख्रिस्तोफर याला त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. (धक्कादायक! आजोबाने केली 7 वर्षाच्या नातवाची धारधार विळ्याने हत्या; परभणी जिल्ह्यातील घटना)
ख्रिस्तोफर याने आजीची हत्या केल्यानंतर तिचे डोक डायनिंग डेबलवर ठेवले होते. तसेच शरीराचे अन्य तुकडे हे कॉम्सो चाळीतील घरभर रक्ताने पसल्याचे दिसून आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे पोलिसांनी गोव्यात असलेल्या त्याच्या वडिलांना फोन करत घडलेला धक्कादायक प्रकार त्यांना सांगितला. हा प्रकार ऐकताच त्याच्या वडिलांनी उलब्ध असलेल्या विमानाने मुंबईत आले. वडिलांनी आपल्या मुलाने केलेला प्रकार पाहता त्यांना धक्काच बसला. मुलगा त्यांच्या नजरेतून उतरल्याचे ही पोलिसांनी म्हटले. मुलगा रक्ताच्या थारोळ्यातच बसला होता. वडिलांनी ख्रिस्तोफर याला याबद्दल विचारले असता त्याने हसत म्हटले की, आजीची हत्या केली.
वांद्रे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेले असता त्यावेळी सुद्धा तो एकमद शांत आणि विचारलेल्या प्रश्नांची हसत उत्तरे देत होता. ख्रिस्तोफर याला 17 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती देत असे म्हटले की, गेल्या 18 महिन्यांपासून ख्रिस्तोफर याच्यावर व्यसनमुक्ती केंद्रात तो जात होता. मात्र केंद्राने त्याच्या पालकांनी 6 लाखांचे बिल न भरल्याने त्याला पुन्हा घरी सोडले. त्याचे पालक इस्राइल येथेच राहतात आणि काम करतात. मात्र नुकतेच त्याचे वडिल त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी येऊन गेले होते.
ख्रिस्तोफर हा चाळीतील दुमजली अशा एका खोलीत राहत होता. खालच्या खोलीत आजी आणि वरती तो राहत असे. हा सर्व प्रकार ज्यावेळी आजी झोपली असता रात्री 13.30 वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी म्हटले.या घटनेनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले होते.