CIDCO च्या 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' (My Preferred CIDCO Home) ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला आता पुन्हा 10 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबई मध्ये सिडको कडून 26 हजार घरं प्रधानमंत्री आवास योजना द्वारा आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गासाठी आणि कमी उत्पन्न वर्गासाठी खुली करून दिली जाणार आहेत. सिडकोची ही घरं वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली मध्ये उपलब्ध होणार आहेत.
11 डिसेंबर पर्यंत या घरांसाठी सुमारे 1 लाख अर्ज आले असल्याची माहिती सिडको कडून देण्यात आली आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता यापूर्वी या योजनेअंतर्गत घरांसाठी अर्ज करण्याचा अंतिम मुदत 26 डिसेंबर होती पण त्यामध्ये आता वाढ करून 10 जानेवारी 2025 करण्यात आली आहे.
'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेला मुदतवाढ
🚪 तुमच्या स्वप्नाचं दार खुलं झालं !
तुमची मनोकामना वास्तवात साकारणारी ही सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन नोंदणी अद्याप सुरूच आहे. नवी मुंबईत तुमच्या स्वप्नातल्या घरापर्यंतचा प्रवास केवळ काही पावलांच्या अंतरावर आलाय. आजच 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेची अर्ज नोंदणी करा. pic.twitter.com/nfk809khlw
— CIDCO Ltd (@CIDCO_Ltd) December 26, 2024
सिडको कडून बारकोड असलेले डोमेसाईल सर्टिफिकेट आणि नोटरी केलेले अॅफिडेव्हिट सादर करण्यासाठी 100 किंवा 500 रूपयांचे स्टॅम्पपेपर या नियमांतही शिथिलता दिली आहे. या योजनेमध्ये पहिल्यांदाच लोकांना ज्या माळ्यावर घर हवं आहे त्या माळ्यावर घरं निवडण्याची सोय आहे. नक्की वाचा: MHADA Konkan Board Lottery 2024: कोकण विभागातील घरांसाठी दुसर्यांदा मुदतवाढ; 6 जानेवारी पर्यंत करा housing.mhada.gov.in वर अर्ज .
अर्जदार आता cidcohomes.com या वेबसाईट वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. यामध्ये हेल्पलाईन च्या माध्यमातून तुमच्या मनातील प्रश्न 9930870000 किंवा 8062368000 या नंबर वर विचारू शकता.