पुण्यात एका तडीपार गुंडाने चक्क पोलीस उपनिरीक्षकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) फरासखाना पोलीस ठाणाच्या (Faraskhana Police Station) हद्दीत बुधवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आला आहे. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर सय्यद असे मृत पोलीस उपरनिरीक्षकाचे नाव आहे. सय्यद हे फारसखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असून खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. दरम्यान, समीर हे बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास बंदोबस्त आटोपून घरी चालले असताना श्रीकृष्ण टॉकीजवळ प्रवीण महाजन त्यांना अडवले. त्यानंतर त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फारसखान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महाजनला अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- मुंबई: Bhagat Singh Nagar भागात भटक्या कुत्र्याला ठार मारल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक
प्रवीण महाजन याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच एक वर्षासाठी त्याला तडीपार केले आहे. सय्यद आणि महाजन यांच्या मध्ये काही वाद होता का किंवा हत्येचे कारण काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. महाजन तडीपार असून हत्यार सोबत घेऊन शहराच्या मध्यवस्तीत आला तोपर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्न आहे.
पुण्यात कोरोनाचे संकट वावरत असताना गुन्हेगारीचे सत्र सुरुच आहे. यातच बुधवार पेठेत देहविक्री करणाऱ्या एका महिलेचाही बुधवारी मध्यरात्री हत्या झाल्याची माहिती समोर आली आहेत. या हत्यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच याप्रकरणातील गुन्हेगाराला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.