अंधेरीतील (Andheri) एका बँकेत सहायक महाव्यवस्थापक असलेल्या 58 वर्षीय पतीची हत्या केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी (Amboli Police) शुक्रवारी एका महिलेला आणि तिच्या मुलाला अटक केली. या दोघांनी 45 मिनिटांच्या कालावधीत त्या व्यक्तीला ठार मारण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न केले. शेवटी वीरा देसाई रस्त्यावरील त्यांच्या सातव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून फेकले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. संतानकृष्णन शेषाद्री असे मृताचे नाव असून ते पत्नी जयशीला आणि 26 वर्षीय मुलगा अरविंद यांच्यासोबत राहत होते. आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश सीताराम बागुल म्हणाले, शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास आम्हाला क्वार्टरमधील एका रहिवाशाचा फोन आला की, एका व्यक्तीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक रवाना करण्यात आले. चौकशी दरम्यान, शेषाद्रीच्या हातावर कापलेल्या खुणा तपासकर्त्यांनी पाहिल्या, असे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या तपास पथकाने त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता, बेडरूममध्ये रक्ताचे डाग आढळले. चौकशी दरम्यान जयशीला यांनी आरोप केला की शेषाद्रीवर मानसिक आजारावर उपचार सुरू होते आणि त्यांनी आपले मनगट कापून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधकांना पुन्हा इशारा,' सरकारही पडणार नाही, मीही झुकणार नाही, जय महाराष्ट्र'
शेषाद्रीने यापूर्वी दोनदा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नाही, असेही तिने सांगितले. मात्र, यावेळी नसा कापून त्याचा मृत्यू होऊ शकला नाही म्हणून त्याने बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारली, असे त्याच्या पत्नीने सांगितले. पोलिसांच्या पुढे असे लक्षात आले की जयश्री आणि अभिनव यांनी घराच्या भिंतीवरील रक्ताचे डाग साफ करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे त्यांना काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले आणि त्यांनी नंतरची चौकशी करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला त्याने खोटे बोलण्याचा प्रयत्न केला मात्र सततच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. जयशीला आणि अरविंद या दोघांनाही नंतर ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांसमोर कबुलीजबाब देताना, त्यांनी आरोप केला की शेषाद्री आपल्या कुटुंबाशी कधीही योग्य वागला नाही. घराच्या खर्चातही हातभार लावत नाही. त्याऐवजी तो छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून वाद घालायचा आणि दररोज त्यांच्याशी भांडायचा, असे आई-मुलाने पोलिसांना सांगितले.
सततच्या छळाला कंटाळून त्यांनी त्याला अशा पद्धतीने मारण्याचा निर्णय घेतला की त्याने आत्महत्या केली आहे असे दिसून येईल, बागुल म्हणाले. दोघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 201 (पुरावा नष्ट करणे) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.