मुंबई: घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन पद्धतीने विकण्याच्या नादात महिलेने गमावले 40 हजार
फोटो सौजन्य- ANI

ऑनलाईन पद्धतीने एखादी वस्तू खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी एका त्याबाबत खात्री करुन घ्यावी असे वारंवार सांगण्यात येते. तरीही काहीजण वस्तूबाबत अधिक माहिती न पाहता ती खरेदी किंवा विक्री करतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. असाच एक प्रकार मुंबईतील वरळी (Worli) येथे राहणाऱ्या एका महिलेने घरातील इलेक्ट्रॉनिक ऑनलाईन पद्धतीने विकण्यासाठी एका मार्केटिंग अॅपवर त्या संदर्भात अधिक माहिती दिली. परंतु या प्रकरणी सदर महिलेची फसवणूक झाली असून तिला 40 हजार रुपये गमवावे लागले असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोहीनी रॉय असे महिलेचे नाव असून तिने वॉगिंश मशीन ,मिक्सर, टोस्टर आणि वॉटर फिल्टर विकायाच असल्याची जाहिरात करत एका अॅपवर त्याची माहिती दिली. तर रॉय हिच्या जाहीरातीवर प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीची ओळख अनिल शर्मा अशी पटली आहे. तर 14 ऑक्टोबरला रॉय हिने शर्मा याच्यासोबत फोनवर ऑनलाईन वस्तू विकण्याबाबत बातचीत केली. त्यावर शर्मा याने माझे वापरलेल्या वस्तू विकण्याचे दुकान असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही ऑनलाईवर पोस्ट केलेल्या वस्तूंबाबत त्या विकल्या गेल्याचे मार्क करण्यास रॉय हिला सांगण्यात आले.(पुणे: दाम्पत्याकडून तब्बल दिड कोटी रुपयांची ब्राउन शुगर जप्त, गुन्हे शाखेची कारवाई)

परंतु गुरुवारी रॉय हिने या सर्व इलेक्ट्रिक वस्तूंसाठी किती रुपये देण्यात येणार याबद्दल शर्मा याला विचारले. त्यावर त्याने 20 हजार रुपये सांगत वस्तूंचे पैसे गुगल पे करतो असे म्हटले. मात्र रॉय हिने मी गुगल पे वापरत नसल्याचे शर्मा याला स्पष्ट केले. यावर शर्मा याने मी तुम्हाला मदत करतो असे सांगत 10 रुपये तिला पाठवत एक बारकोड ही पाठवला. परंतु रॉय हिने बारकोड स्कॅन केल्यानंतर तिला बँक खात्यामधून 20 हजार रुपये दोन वेळेस कापले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. याबाबत दादर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.