मुंबई: प्रियकरासोबत मिळून केली नवऱ्याची हत्या, बायकोला पोलिसांकडून अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

मुंबईतील शिवाजी नगर (Shivaji Nagar) पोलिसांनी एका 35 वर्षीय महिलेला नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. नवऱ्याला मारण्याचा कट हा आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत रचल्याचे सांगण्यात येत आहे. यास्मिन असे महिलेचे तर पतीचे अब्दुल्ला असे पतीचे नाव आहे. अब्दुल्ला हा सिव्हिल वर्क पेंटर असून तो गेल्या महिन्यात नवी मुंबईत मृत आढळून आला होता. परंतु त्यावेळी अब्दुल्ला याचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवून दिल्याने त्यानुसार पोलिसांनी मृत्यू रिपोर्ट तयार केला होता.(धक्कादायक! मुलीच्या खोडींना कंटाळून रागाच्या भरात जन्मदात्या आईने 4 वर्षांच्या मुलीची भिंतीला डोके आपटून आणि गळा दाबून केली हत्या)

परंतु अब्दुल्ला याच्या भावाने या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असताना असे म्हटले आहे की, हा एक अत्यंक वाईट प्रकार असून त्यात नौशेध खान याचा सुद्धा समावेश असल्याचा संशय त्याने व्यक्त केला होता. त्यामुळे तपासावेळी कोणताच संशय येऊ नये म्हणून खान याने हत्येबाबत गुपीत ठेवले. मात्र अखेर त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्याने यामध्ये यास्मिन हिच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला.(महाराष्ट्र: लातुर येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरवर चाकूहल्ला)

खान याने पुढे असे म्हटले की, त्याचे यास्मिन सोबत गेली दोन वर्ष अफेअर सुरु होते. तर अब्दुल्ला याच्यावरील 2 लाखांचे कर्ज असून तो फेडू शकला नाही. खान आणि त्याची जोडीदार यांनी मिळून अब्दुल्ला याची हत्या केली आणि त्याचा मृत्यू अपघाती झाल्याचे दाखवून दिल्याचे पोलिसांनी या प्रकरणी म्हटले आहे.

तर काही दिवसांपूर्वी जालना येथे एका मनोरुग्ण पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मृत महिलेच्या पतीविरोधीत खुनाचा गुन्हा दाखल करत पुढील चौकशीला सुरुवात केली होती.  मृत महिलेचा पती गेल्या अनेक दिवसांपासून वेड्यासारखा वागत असल्याचे माहिती समोर आली होती. तसेच या वेड्याच्या भरातच त्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे सांगण्यात आले होते.