धक्कादायक! मुलीच्या खोडींना कंटाळून रागाच्या भरात जन्मदात्या आईने 4 वर्षांच्या मुलीची भिंतीला डोके आपटून आणि गळा दाबून केली हत्या
Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात घडली आहे. खोडकरपणा हा लहान मुलांच्या बालपणाचा एक भाग असतो. त्यात सध्या लॉकडाऊनमुळे मुले घरात राहूनही कंटाळली आहेत. यामुळे त्यांचीचील खोडकरपणा वाढला आहे. मात्र याच खोडकरपणाला समजून घेण्यापेक्षा तिच्या त्रासाला कंटाळून एका विक्षिप्त आईने आपल्या 4 वर्षांच्या मुलीचे डोके भिंतीला आपटून आणि तिचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

काळजाचे तुकडे तुकडे करणा-या घटनेने संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, 27 जुलै ला या आरोपी महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीच्या खोडकरपणाला कंटाळून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे.

हेदेखील वाचा- धक्कादायक: मांत्रिकाच्या नादाला लागून वडिलांनी केली आपल्या 5 मुलांची हत्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणातील एका वडिलांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वत: च्या पाच मुलांची हत्या केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जिंद जिल्ह्यातील डिडवारा गावचे आहे.