महाराष्ट्र: लातुर येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरवर चाकूहल्ला
Image used for represenational purpose (File Photo)

लातुर (Latur) येथील एक धक्कादायक घटना समोर आली असून यामध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरला चाकूहल्ला करण्यासह शिवीगाळ केली आहे. हा प्रकार शहरातील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयामधील आहे. सध्या राज्यातील सर्व डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी कोरोनाग्रस्तांसाठी दिवसरात्र झटत आहेत. तरीही डॉक्टरांवर हल्ले केल्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा उघडकीस आले आहेत.(माथाडी कामगार, सुरक्षा रक्षक यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करणार, मिळणार 50 लाख रुपयांचे विमा कवच)

रुग्णाचा मृत्यू झाल्याने दिनेश वर्मा या डॉक्टराला नातेवाईकांनी अमानुष पद्धतीने हल्ला झाला. मृत झालेल्या रुग्णाला कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार सुद्धा असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर मृत व्यक्ती रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होता. तर महिला ही वृद्ध असल्याने तिला गंभीर आजारांनी ग्रासले होते. याबाबत डॉक्टरांनी नातेवाईकांना सुद्धा सांगितले होते. तसेच महिलेच्या प्रकृतीबाबत ही नातेवाईकांना माहिती देण्यात येत होती.(Maharashtra 'Mission Begin Again': महाराष्ट्रामधील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी, जाणून घ्या काय असेल सुरु)

मात्र महिलेच्या मृत्यूनंतर वाद निर्माण होत आरोपीने डॉक्टरांच्या छातीवर, मानेवर आणि हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामुळे वर्मा यांना गंभीर दुखापत ही झाली. यानंतर वर्मा यांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या वर्मा यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.