Western Railway Monsoon Helpdesk: दादर, मुंबई सेंट्रल सह 7 रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वे देणार मुंबईकरांना मोफत छत्री आणि व्हिलचेअर ची सोय
Mumbai Train (Photo Credits: ANI)

मुंबईमध्ये हवामानखात्याचे आडाखे मोडत कधीही पाऊस हजेरी लावत अशावेळेस वयोवृद्ध अअणि दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने (Western Railway) आता मान्सून विशेष हेल्प डेस्क सुरू केला आहे. वांद्रे, वांद्रे टर्मिनल्स, दादर, मुंबई सेंट्रल, बोरिवली, भाईंदर आणि अंधेरी या सात स्थानकांवर छत्री आणि व्हिलचेअर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. लवकरच ही मुंबईतील इतर रेल्वेस्थानकांवरही सुरू करण्यात येणार आहे. Sakhi WhatsApp Group च्या माध्यमातून पश्चिम रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार मदत, प्रशासनाने जाहीर केला क्रमांक

पश्चिम रेल्वे स्थानकावर वयोवृद्धांना बाहेर पडताना छत्रीची गरज असेल तर हेल्पडेस्कवर मदत मागू शकतात. उपस्थित RPF संबंधित व्यक्तीसोबत छत्री घेऊन त्याला बस / टॅक्सी/रिक्षा स्टॅंडपर्यंत जाण्यास मदत करेल. तसेच दिव्यांगांनादेखील लिफ्ट नसलेल्या रेल्वेस्थानकांमध्ये व्हिलचेअरची मदत मिळू शकते. RPF अधिकारी त्या व्यक्तीला ट्रेनमध्ये चढवण्यास मदत करेल.

2017 साली मुंबईमध्ये एलफिस्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 23 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या घटनेवरून धडा घेत आता पश्चिम रेल्वेने 800 रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकार्‍यांची टीम तैनात करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर उभारण्यात आलेले हेल्पडेस्क देखील RPF कडून सांभाळला जाणार आहे. मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेकडे पुरेसा छत्रींचा साठा असून मुंबईकरांच्या मदतीसाठी RPF जवान सज्ज आहेत.