Mumbai Local (Photo Credit: Wikimedia Commons)

Mumbai Mega Block News: मुंबईतील पश्चिम रेल्वे (Mumbai Western Railway) मार्गावर गोरेगाव ते कांदिवली (Goregaon To Kandivali Mega Block) दरम्यान दीर्घ ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दोन स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचे काम सुलभ करण्याच्या हेतूने हा ब्लॉक येत्या 28 ते 29 सप्टेंबर असा दोन दिवस घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात प्रवास करणाऱ्या अप आणि डाऊन (जलद आणि संथ मार्गावरुन) अशा दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या तसेच, 5 व्या मार्गिकेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसू शकतो. मध्य रात्री 12.00 ते सकाळी 10.00 अप आणि रात्री 12.45 ते पहाटे 5.00 डाऊन दिशेने होणारी रेल्वे वाहतूक या काळात प्रभावित झालेली असेल. दरम्यान, 5 वी मार्गिका रात्री 12.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दिशेसाठी प्रभावित असेल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी माहिती देताना म्हटले आहे.

कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक कसा?

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग): या मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीमा अशा दोन्ही दिशांना सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असेल.

हार्बर रेल्वे: या मार्गावर कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या कालावधीसाठी ब्लॉक घेण्यात येईल.

पश्चिम रेल्वे: या मार्गावर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद अशा पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल. जो शनिवारी मध्य रात्री 12.00 पासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी 10.00 पर्यंत सुरु राहील. (हेही वाचा: Mumbai Local Train Stunt Video: लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल)

मुंबईमध्ये लोकल वाहतुकीस फटका

दरम्यान, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबई मेगा ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या वेगाने धावणाऱ्या सर्व लोकल बोरीवली आणि अंधेरी स्थानकादरम्यान धिम्या मार्गिकेवरुन चालतील. त्यामुळे उपनगरीय रेल्वे वाहतूकीला काही प्रमाणात फटका बसू शकतो. ज्यामुळे काही लोकल रद्द केल्या जाऊ शकतात. तर काही संथ गतीने धाऊ शकता. (हेही वाचा, Mumbai Local Train Death: जीवघेणा लोकल प्रवास! 20 वर्षांत 51,000 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती)

मुंबई लोकल ट्रेन अपडेट्स

काही उल्लेखनीय बदलांबाबत बोलताना अभिषेक म्हणाले, ट्रेन क्रमांक 94078 विरार-अंधेरी फास्ट एसी लोकल आणि ट्रेन क्रमांक 91016 विरार-अंधेरी लोकलचा अल्पावधीत समावेश आहे. प्रवाशांच्या सोईसाठी जादा गाड्या चालवल्या जातील. प्रवाशांनी सविस्तर माहितीसाठी स्टेशन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रभावित सेवांमध्ये ट्रेन क्रमांक 90004 बोरिवली-चर्चगेट लोकल आणि ट्रेन क्रमांक 92001 बोरिवली-विरार लोकल यांसारख्या गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकांसह उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस दोन्ही गाड्यांचा समावेश आहे.