Mumbai Local Train Stunt Video: लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल
सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाई कोणतीही हद्द पार करतात आणि व्हिडिओ शूट करतात. रविवारी एका तरुणाने लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना धोकादायक स्टंटबाजी केली होती.
Mumbai Local Train Stunt Video: सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाई कोणतीही हद्द पार करतात आणि व्हिडिओ शूट करतात. रविवारी एका तरुणाने लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना धोकादायक स्टंटबाजी केली होती. हा स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकल ट्रेनमध्ये चढताना भरधाव वेगात असलेल्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी केल्याचे व्हिडिओ दिसत आहे.( हेही वाचा- नाशिक-मुंबई महामार्गावर ब्रेझा कार आणि आयशर टेम्पोमध्ये जोकदार धडक; 4 ठार (Watch Video)
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तरुणावर संताप व्यक्त केला तसेच प्रशासन अश्या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याचे नेटकऱ्यांनी सांगितले. हा व्हिडिओ हार्बर मार्गावरील शिवरी रेल्वे स्थानकावर शूट केल्याचे दिसत आहे. या आधी रेल्वे स्थानकावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा रिल्स बनवण्यासाठी स्वत: चा जीव धोक्यात घातल आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास दिल्याचे घटना घडली.
पाहा व्हिडिओ
#WATCH: Mumbai Man Performs Dangerous Stunt, Glides On Platform Holding Local Train Handle At Sewri Station#MumbaiLocal #LocalTrain #Stunt #ViralVideo #RailwayStation #MumbaiNews pic.twitter.com/ymMVxuivUW
— TIMES NOW (@TimesNow) July 15, 2024
शिवरी रेल्वे स्थानकावर तरुणाला स्टंटबाजी करणं महागात पडले आहे. रेल्वे पोलिस या घटनेनंतर अॅक्शन मोडवर आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2024 11:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

