Photo Credit- X

Nashik-Mumbai Highway Accident: नाशिक-मुंबई महामार्गावर(Nashik-Mumbai Highway) भीषण अपघात झाला आहे. आडगाव येथे ब्रेझा कार आणि आयशर टेम्पो यांच्यात धडक झाली. या आपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. रात्रीच्या वेळी अंधारात हा अपघाता झाला. अपघाताचे कारण समोर आलेले नाही. मात्र, मोठी जीवितहानी झाली आहे. दरम्यान, काल कसारा घटातही एका कंटनेरने 5 गाड्यांना धडक दिली. यात अनेकांचा मृत्यू झाला.या अपघातातील 9 जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.(हेही वाचा:Gorakhpur LTT Express Brake Liner Fire: गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसच्या ब्रेक लाइनरला आग; ठाकुर्ली स्थानकाजवळ घडली घटना )

अपघाताचा व्हिडीओ

दुपारी अडीचच्या सुमारास नाशिक-मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात भल्या मोठ्या कंटेनर वाहनासह 5 कार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरने समोर चालणाऱ्या 5 कार गाड्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात मारुती सियाझ, ह्युंदाई, किया, मारुती बलेनो आणि मारुती स्विफ्ट या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोखंडी खांब घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने नवीन कसारा घाटातील तीव्र उतार वळणावर असलेल्या धबधबा पॉईंटच्या अलीकडे हा अपघात घडला.