Mumbai Weather Updates: मुंबईत काल काही ठिकाणी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र काही ठिकाणी पाऊस नाही पडला. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार आज मुंबईत ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे. मुंबईचे तापमान आज किमान 26 अंश सेल्सिअस ते कमाल 33 अंश सेल्सिअस च्या आसपास असेल.आज हलक्या पावसाच्या सरी देखील अपेक्षित आहे. व रविवार आणि सोमवारी किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान अंदाज नुसार येणाऱ्या आठवड्यामध्ये वातावरण ढगाळ राहील व हलका ते मध्यम सरी चा पाऊस पडेल. हवामान खात्याने जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, शहर तसेच ठाणे, रायगड आणि पालघर, जेथे यलो अलर्ट देण्यात आले आहे, तेथे 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, गडगडाट, विजसह पावसाची शक्यता आहे. किमान रविवारपर्यन्त हा इशारा कायम राहील. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने मुंबई शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Weather Forecast Maharashtra: मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान अंदाज.
मुंबई मध्ये कसे असेल उद्याचे हवामान?
प्रत्यक्षात मान्सूनचे आगमन होताच मुंबईतील काही भागात सुमारे 100 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार पश्चिम उपनगरात बुधवार ते गुरुवार सकाळ दरम्यान केवळ 5.96 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पूर्व उपनगरे (1.37 मिमी पाऊस) ची नोंद झाली.