Photo Credit : Pixabay

Mumbai Weather Prediction, July 8 : आज सकाळी मुंबई शहर आणि आसपासच्या भागात ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजनुसार, शहर आणि उपनगरात ही परिस्थिती दिवसभर कायम राहण्याची अपेक्षा आहे.दिवसाची सुरुवात 26 अंश सेल्सिअस किमान तापमानाने झाली आणि कमाल 33 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, रविवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस व  मधूनमधून ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

आज ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तसेच नाशिक व पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे ह्यासाठी हवामान विभागने मुंबईत उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज, 7 जुलै, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला. आयएमडीच्या अंदाजानुसार राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे.IMD ची 6 जुलै रोजीची प्रेस रिलीझ म्हणते, 07 ते 10 तारखेदरम्यान कोकण आणि गोव्यात एकाकी मुसळधार पावसाची शक्यता आहे.