![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/07/1-कोकणातील-उद्याचे-हवामान-अंदाज-1-380x214.jpg)
Mumbai Weather Prediction, July 14: भारतीय हवामान खात्याने (IMD) आज 13 जुलै रोजी मुंबईत भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे शहराला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील 24 तासांत या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या काही भागात आज सकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.आणि पुढच्या 24 तासात मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे.आयएमडीनुसार, गेल्या 24 तासात शहरात 61.69 मिमी पाऊस झाला आहे. प्राधिकरणाने आज संध्याकाळी 4:06 वाजता मुंबईत 3.87 मीटर 'उच्च भरती'चा इशारा दिला.IMD नुसार, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 आणि 24 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान विभागने मुंबईत उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
भारतीय हवामान खात्याने (IMD) कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सतर्कता लक्षणीय पर्जन्यवृष्टी आणि संभाव्य व्यत्यय येण्याची शक्यता दर्शवते.12 जुलै रोजी प्रसिद्धीपत्रकात, IMD ने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा येथे 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आंध्र प्रदेशात रविवार आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.