प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी चारचाकी वाहनांवर 'रिफ्लेक्टर' बंधनकारक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

केंद्र सरकारने आता राज्यात वाहनांसाठी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणित रिफ्लेक्टर (Reflector) लावणे बंधनकार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीच्या प्रवासादरम्यान होणारे अपघात किंवा वाहनांमध्ये सुरक्षित अंतर रहावे यासाटी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे जर या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास वाहनांची योग्यता तपासणी रद्द करण्यात येणार आहे.

वाढत्या रस्ते अपघातांमुळे वाहनांवर रिफ्लेक्टर असणे बंधनकारक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचसोबत परावर्तक, रिफ्लेक्टर टेप आणि वाहनाच्या मागील बाजूला रिअर मार्किंग प्लेट बसवणे अनिवार्य आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस वाहनांना एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होईल. परंतु खासगी वाहनांवर रिफ्लेक्टर न लावल्यास वाहन नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.(नागपूर: खुल्या प्रवर्गातील तरूणांना नोकरी द्या अन्यथा गंभीर परिणामांसाठी सज्ज व्हा; सिटी बस स्टॉप वर धमकीपत्राने खळबळ)

सध्या रिफ्लेक्टरचा दर्जा निकृष्ट असल्याने वाहनांमधील अंतर पटकन कळून येत नही. त्यामुळे बहुतांश प्रमाणात अपघात होतात. त्यामुळेच एआयअस प्रमाणित रिफ्लेक्टर असावे याची सक्ती करण्यात आली आहे. तर एआयएस प्रणालीवरील क्युआर कोड स्कॅन केल्यावरच वाहन चालकांना परावर्तक देण्यात येणार आहेत.