Image use For Representation (Photo Credits: Youtube)

नागपूर (Nagpur) शहरातील जवळपास सर्वच बस स्टॉप वर आज सकाळी केंद्र सरकार व कंपन्यांना उद्देशून लिहिलेलं धमकीपत्र आढळून आलं आहे. या पत्रात खुल्या प्रवर्गातील (Open Category Students) तरुणांना नोकरी द्या अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना लवकरच देवाघरी पोहचवू अशा शब्दात ताकीद देण्यात आली आहे. आज सकाळी 10.30 वाजल्याचा सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) बाहेरील अमरावतीकडे (Amravati) जाणाऱ्या महामार्गाजवळच्या बस स्टॉप वर सर्वात आधी हे धमकीपत्र सापडले,  त्यापाठोपाठ सर्वच बस स्टॉपवर हे पत्र चिटकवण्यात आल्याचे पोलिसांना समजले. नोकरीची मागणी पाहता हे काम विद्यार्थी संघटनेचे असणार असा अंदाज वर्तवला जात आहे, मात्र यामागे नेमका सूत्रधार कोण याचा शोध अद्याप लागलेला नाही.

माध्यमांच्या माहितीनुसार, हे धमकीपत्र तीन पानांचे असून यावर खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्या. ही धमकी गांभीर्यानं घ्या. अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देवाघरी पाठवू, असा मजकूर लिहिलेला आहे. आमच्याकडे शूटर्स आणि हल्लेखोर आहेत, असा उल्लेख देखील पत्रकात आढळतोय. एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर तातडीने लँडींग

दरम्यान याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे, सार्वजनिक स्थळी आक्षेपार्ह्य संदेश लावण्यासाठी दोषींना शिक्षा मिळू शकते, मात्र तूर्तास नागरिकांमध्ये खळबळीचे वातावरण पाहायला मिळत आहे.