एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर तातडीने लँडींग
Representational Image (Photo Credits: Youtube Grab/Nijam Ashraf)

मुंबईहून नेवार्कला (Mumbai-Newark) जाणाऱ्या एअर इंडिया (Air India) कंपनीच्या Air India 191 विमानाचे लंडनच्या (London) स्टॅनस्टेड विमानतळावर (Stansted Airport) तातडीने लँडींग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याच्या संशयावरुन हे लँडींग करण्यात आले.  तातडीने केलेल्या लँडींगमुळे विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र याबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

ANI ट्विट:

Air India 191 विमानाच्या तातडीने केलेल्या लँडींगमुळे इतर प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळ प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. पण आता धावपट्टी पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. तसंच प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाबद्दल आभारही मानले आहेत.

यापूर्वी सिंगापूर एअरलाईन्सचे मुंबईहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानाचे बॉम्ब असल्याच्या संशयावरुन तातडीने लँडींग करण्यात आले होते.