Result Photo Credit: (File Image)

MU 2019 First Merit List: मुंबई विद्यापीठाची पहिली मेरीट लिस्ट आज (17 जून) संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. सुमारे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठात 7.8 लाख अर्ज केले आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल गडगडल्याने आणि त्यापाठोपाठ एचसी बोर्डाकडून गुणपत्रिका मिळण्यास उशिर झाल्याने  मुंबई विद्यापीठांच्या अ‍ॅडमिशनच्या वेळापत्रकामध्ये बदल आहे. आज संध्याकाळी 5 वाजता mu.ac.inवर विद्यार्थ्यांना पहिली मेरीट लिस्ट पाहता येणार आहे.  Mumbai University Admissions 2019 साठी आवश्यक कागदपत्र कोणती ?

मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर पहिली मेरीट लिस्ट कुठे पहाल आणि डाऊनलोड कराल?

  • मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट mu.ac.in ओपन करा.
  • वेबसाईटवर ‘Mumbai University First Merit List’लिस्ट पहा.
  • त्यानंतर दिलेल्या सूचना नीट वाचा.
  • MU application number देऊन निकाल पाहता येईल.
  • त्यानंतर मुंबई विद्यापीठाची पहिली मेरीट लिस्ट डाऊनलोड करा.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या मेरीट लिस्टमध्ये अ‍ॅडमिशन मिळाल्यानंतर 18-20 जून दरम्यानकागदपत्रांची छाननी करून अ‍ॅडमिशन घेण्याचीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.