मुंबई युनिव्हर्सिटीच्या उन्हाळी सत्रामधील परिक्षांचे निकाल अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी संतप्त
Mumbai University (Photo Credits- Facebook)

मुंबई युनिव्हर्सिटीने(Mumbai University) उन्हाळी सत्रामधील विविध परिक्षांचे निकाल अद्यार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप दिसून येत आहे. तर परिक्षेच्या 45 दिवसानंतरच्या कालावधीत परिक्षेचा निकाल जाहीर केला जाईल असे सांगण्यात आले होते. तरीही अजून निकाल युनिव्हर्सिटीने झळकवले नाहीत.

युनिव्हर्सिटीकडून 731 परिक्षांपैकी 175 परिक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात येतात. तर 438 परिक्षा युनिव्हर्सिटीतर्फे घेण्यात येतात. त्यापैकी 255 परिक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आले आहेत. परंतु पदव्युतर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(मुंबई विद्यापीठाच्या 'आयडॉल'मध्ये सावळा गोंधळ; FYBA च्या तब्बल 236 विद्यार्थ्यांना परीक्षेत भोपळा)

 परिक्षेच्या 45 दिवसांमध्ये निकाल जाहीर करावा असा युनिव्हर्सिटीचा नियम आहे.तरीही एवढे दिवस उलटूनसुद्धा निकाल विद्यार्थ्यांना कळवण्यात आलेला नाही. त्यामुळे अन्य युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे.