मुंबईमध्ये मंत्रालयात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या शिक्षकांच्या शिष्टमंडळापैकी दोन व्यक्तींनी आज आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामधील 2 शिक्षकांनी आज मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारल्याने काही काळ मंत्रालय परिसरात गडबड - गोंधळांचं वातावरण निर्माण झालं आहे. हेमंत पाटील (Hemant Patil) आणि अरूण नेतोरे (Arun Netore) असं त्या दोन शिक्षकांचं नाव आहे. मंत्र्यांशी भेट न झाल्याने संपप्त दोघांनी संरक्षक जाळीवर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या दुसर्या मजल्यावर संरक्षक जाळी लावलेली असल्याने अनर्थ टळला आहे.
आज (18 सप्टेंबर) संध्याकाळी जळगाव येथून आलेल्या 10 जणांच्या शिक्षकांच्या मंडळाने दिव्यांगांच्या शाळेला अनुदान मिळावे म्हणून मंत्र्यांची भेट मागितली होती. मात्र ही भेट न झाल्याने दोन जण संतापले. त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आपाला निषेध नोंदवला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना वेळीच बाहेर काढले. अखेर मंत्रालयाच्या 'त्या' चर्चित पायऱ्या तोडल्या; जाणून घ्या काय आहे कारण
ANI Tweet
Maharashtra: Two men, Hemant Patil and Arun Netore, jumped off the second floor of Mantralaya Building onto the safety net in Mumbai, today. They were demanding grants for divyang schools. They were taken away by the police. pic.twitter.com/q8LFfsnqOY
— ANI (@ANI) September 18, 2019
2018 साली, राज्य सरकारने मंत्रालयात होणार्या आत्महत्येचा प्रयत्न आणि त्यातून अघटीत गोष्टी टाळण्यासाठी संरक्षक जाळी बांधली आहे. यापूर्वी अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या आतमहत्येच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामधून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मंत्रालयाच्या परिसरात ही संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे.