मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) लिंक अर्थातच अटल सेतू मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज (शुक्रवार, 12 जानेवारी) उद्घाटन होणार आहे. उल्लेखनीय असे की, देशातील सर्वात लांब सागरी सेतू (Mumbai Trans Harbor Link) अशी याची ओळख आहे. महाराष्ट्राचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, हा सेतू ज्या भागांना जोडतो त्या भागात आर्थिक उन्नती मोठ्या प्रमाणावर होईल. ती झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता यांना या सेतूबद्दल प्रदीर्घ काळापासून उत्सुकता होती. जी आज संपणार आहे.
मुंबई येथील ट्रान्स हार्बर लिंकचे कागदोपत्री नाव अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सेतू असे आहे. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. तो उभारण्यासाठी सुमारे 17,840 कोटी रुपये खर्च आला. अटल सेतूसोबतच पंतप्रधान आज देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये विविध विकास प्रकल्पांचेही उद्घाटन करतील. सांगितले जात आहे की, ते आज महाराष्ट्राला 30,500 कोटी रुपयांच्या योजना महाराष्ट्राला देतील. (हेही वाचा, Mumbai Trans Harbour Link (MTHL) Photos: उद्या होणार देशातील सर्वात लांब सागरी सेतू- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन; पहा या पुलाचे काही विहंगम फोटोज (See Photos))
कसा असेल कार्यक्रम?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईत अटल सेतू (MTHL) पुलाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता करतील. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी कुलाब्यातील INS शिक्रा ते नवी मुंबई या आगामी विमानतळाजवळील भारतातील सर्वात लांब सागरी पुलावरून प्रवास करतील. (हेही वाचा: PM Modi to Inaugurate MTHL: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'चे लोकार्पण; 'या' मार्गावर जड वाहतूक राहणार बंद)
पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा
नाशिक येथील कार्यक्रम
सकाळी 10 - नाशिक विमानतळ येथे आगमन, सकाळी 11 ते 12- काळाराम मंदिर येथे पूजा आणि दर्शन, दुपारी 12 ते 2 - राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम तपोवन ग्राऊंड, नाशिक, दुपारी 2 - तपोवन मैदानाकडून हॅलिपॅडकडे, दुपारी 2.10 नाशिकवरून आयएनएस मुंबईला रवाना
मुंबई येथील कार्यक्रम
दुपारी 3.10- आयएनएस शिक्रावरुन एमटीएचएल स्टार्टिंग पॉईंटकडे रवाना, दुपारी 3.30- एमटीएचएल सागरी सेतूचे उद्घाटन, दुपारी 4.10 - एमटीएचएलकडून नवी मुंबईकडे प्रस्थाण, दुपारी 4.15 वाजता- नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ मैदानावरील विविध उद्घाटनाला सुरुवात, सायंकाळी 5.35 वाजता- नवी मुंबई विमानतळावरून हॅलिपॅडकडे प्रयाण, सायंकाळी 5.40 वाजता - नवी मुंबई हॅलिपॅडकडून मुंबई विमानतळ प्रयाण, सायंकाळी 6.10 वाजता मुंबई विमानतळावरुन दिल्लीला रवाना
व्हिडिओ
#WATCH | Prime Minister Narendra Modi will inaugurate Atal Setu - the Mumbai Trans Harbour Link, which is India's longest bridge built on the sea and will see the movement of more than 70,000 vehicles every day, on January 12 pic.twitter.com/JSTZUBfetn
— ANI (@ANI) January 11, 2024
ट्रान्स हार्बर लिंक टोल दर
शिवडी-शिवाजी नगर (उलवे) मार्गासाठी 200 रुपये आणि 2.5 किमी शिवाई नगर-गव्हाण मार्गासाठी 50 रुपये इतका टोल निश्चित करण्यात आला आहे. सर्व मिळून 250 रुपये इतका टोल आकारण्यात येणार आहे. परतीच्या प्रवासासाठी हाच टोल एकतर्फी शुल्काच्या 1.5 पट असेल. अटल सेतू म्हणजेच MTHL पूल प्रवाशांसाठी शनिवारी सकाळी खुला होईल.