मुंबईच्या रस्त्यांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा धावणार; राज्य परिवहन प्राधिकरणाची प्रस्तावाला मंजुरी
Electric Vehicles | Representational Image (Photo Credit: Twitter)

पर्यावरण पूरक इलेक्ट्रॉनिक वाहनांचा (Electric Vehicles) वापर वाढवण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत आता मुंबईच्या रस्त्यांवर इलेकट्रोनिक ऑटो (E-Auto) रिक्षा सुद्धा धावणार असल्याचे समजत आहे. महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) आचारसंहितेच्या घोषणेआधी राज्य परिवहन प्राधिकरणाने या ई-ऑटो प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या ई-ऑटो या नियमित काळ्या-पिवळ्या रिक्षा पेक्षा काहीश्या हटके रूपात पाहायला मिळणार आहेत. निळ्या रंगाच्या रिक्षेवर पांढऱ्या रंगाचे छप्पर असे या ऑटोचे स्वरूप असेल.

Electric Vehicles वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! 'हिरव्या नंबर प्लेट' सोबत मिळणार या सवलती

राज्य शासनाकडून याबाबत अधिकृत मान्यता मिळताच या निळ्या पांढऱ्या ऑटो रिक्षा मुंबईच्या रस्त्यांवर धावताना पाहायला मिळणार आहेत, पण या साठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय या ई-ऑटो साठी हिरव्या रंगाची खास नंबरप्लेट लावण्यास परवानगी मिळावी असा देखील प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वाहतूक मंडळातील काही अधिकाऱ्यांनी टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार, ई- ऑटो साठी वेगळ्या रंगाची निवड करणे ही चांगली कल्पना असल्याचे म्हंटले आहे. या ऑटो रिक्षांमुळे परिसरात शांतता व पर्यावरणाची निगा राखण्यास मदत होईल असे मत देखील त्यांनी मांडले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बेस्ट कडून 4 इलेक्ट्रॉनिक एसी बसेसची सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी 2017 नोव्हेंबर मध्ये बेस्ट ने सहा एसी बसच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास सुरुवात केली होती. यानंतर 30 ऑक्टोबर पर्यंत बेस्टच्या ताफ्यात अन्य 30 इलेक्ट्रानिक बस सामील करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.