प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

घाटकोपर येथे राहणाऱ्या तीन जणांनी बस चालकावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना एका वर्षाची तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा प्रकार 2014 मध्ये घडला असून बस चालकाने कोर्टाला असे सांगितले की, यामधील एक आरोपी चेंबूर येथे गर्दीच्या ठिकाणी बाइकवर स्टंट करत होता. तर रुपेश शिगवण, सुनील लोंढ आणि अजय मोरे अशी आरोपींची नावे आहेत. तर सार्वजनिक कर्मचाऱ्याला नोकरीवर असताना मारहाण करण्यासह गैर कृत्य केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यामध्ये सहा साक्षीदार असून त्यात बस चालक संदीप शिंदे यांचा सुद्धा समावेश आहे. शिंदे यांनी कोर्टाला सांगितले की, 18 ऑगस्ट 2014 मध्ये दही हंडीच्या वेळी रस्त्यावर खुप गर्दी झाली होती. तर रात्री 8.40 वाजल्याच्या सुमारास चेंबूर नाका येथे बस पोहचली असता आरोपींकडून बसच्या समोरच बाईकवर स्टंट केले जात होते. त्यामुळे आरोपींना बाईक बस समोरुन बाजू करण्यास सांगितले असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अन्य सहप्रवाशांनी सुद्धा तेच सांगितले असता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.(Maharashtra: उपचार देऊ शकत नाहीत तर वडीलांना इंजेक्शन देऊन मृत्यू द्या, चंद्रपुरात मुलाची हाक)

शिंदे यांनी पुढे म्हटले की, आणखी काहीजण आले आणि त्यांनी बसवर जोरजोरात हात मारत वाजवण्यास सुरुवात केली. पुढे आरोपीने सुद्धा बसवर आपली मोटरसाकल आदळली. शिंदेच्या समोर बाइक थांबवून बस अडवण्याचा प्रयत्न ही केला गेला. तसेच ते बसच्या पुढील दाराने आतमध्ये आले आणि शिंदे यांना मारहाण केली.(Mumbai: खोटे COVID19 रिपोर्ट्स देत असल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला अटक)

या घटनेवेळी पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. तसेच शिंदे यांनी कोर्टाला असे सांगितले की, मी आणि प्रवाशांनी सुद्धा त्यांना स्टंटबाजी करणे थांबवा असे वारंवार सांगितले. ज्या लोकांनी हा प्रकार पाहिला त्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला दादर टीटी येथे जायचे होते. मात्र त्यांनी आरोपीचा चेहरा स्पष्टपणे पाहिला नाही पण त्याने चालकाला मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले.