Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यंत चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच एका मुलाला आपल्या वडिलांच्या उपचारासाठी खुप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील दुसऱ्या राज्यात फिरावे लागत आहे. तरीही सुद्धा रुग्णालय उपचारासाठी उपलब्ध होत नाही आहे. खरंतर परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, आता रुग्णालयात रुग्णांवर उपचारासाठी बेड्स सुद्धा उपलब्ध होत नाही आहेत. याच दरम्यान एक मुलगा आपल्या वडीलांच्या उपचारासाठी बेडची व्यवस्था कुठे होतेय का यासाठी वणवण फिरतो आहे. पण त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावावे लागत आहे.(Covid Vaccination Centres in Mumbai: सध्या मुंबईमध्ये 124 केंद्रांवर कोरोना विषाणू लसीकरण मोहीम सुरु; BMC ने जाहीर केली यादी See List)
चंद्रपुरातील एका मुलाने या संदर्भातील व्हिडिओ शूट केला आहे. त्यामध्ये त्याने असे म्हटले आहे की, गेल्या 2 दिवसांपासून रुग्णवाहिकेत बसून आपल्या वडीलांना उपचारासाठी कुठे बेड उपलब्ध आहे का यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अखेर ऐवढे प्रयत्न करुन सुद्धा वडीलांना बेड कुठेच उपलब्ध झालेला नाही. अशातच हार मानलेल्या मुलाने पुढे असे म्हटले की, जर माझ्या वडीलांना उपचार मिळणारच नसेल तर त्यांना इंजेक्शन देऊन मृत्यू द्या. कारण अशा स्थितीत तो वडीलांना घेऊन घरी सुद्धा जाऊ शकत नाही आणि रुग्णालय सुद्धा त्यांना भर्ती करुन घेण्यास तयार नाही.(Mumbai: मास्क घालण्यास नकार देवून पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीस मुलुंडमध्ये अटक)
अशी परिस्थिती फक्त चंद्रपुरातच नव्हे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात निर्माण झाली आहे. जेथे लोकांना उपचारासाठी बेड्स मिळणे मुश्किल झाले आहे. काही ठिकाणी तर ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडत असून आयसीयू बेड्स सु्द्धा उपलब्ध नाहीत. दुसऱ्या बाजूला शासकीय रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार दिले जात असल्याचे चित्र आहे. त्याचसोबत अन्य ठिकाणी लोकांना खुर्चीवर बसून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.