बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर मुंबईतील ड्रग्ज रॅकेट आणि बॉलिवूडमध्ये पसरलेले ड्रग्जचे जाळे प्रकर्षाने समोर आले. त्यात हळूहळू तपास करत करत आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली. यात आतापर्यंत अनेक ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, मेफेड्रॉन ड्रग्ज, कोकेन अशा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. त्यातच काल (15 मार्च) नवी मुंबईत NCB टाकलेल्या धाडीत एका नायजेरियन ड्रग्ज पेडलरला (Drugs Peddler) अटक करण्यात आल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ड्रग्ज पेडलरकडून कोकेन देखील जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्ज पेडलरकडून पोलिस त्याच्या अन्य साथीदारांची तसेच हे रॅकेट कुठवर पसरले आहे याची माहिती घेत आहे.हेदेखील वाचा- मुंबई: अंधेरी भागातून ड्रग्ज पेडलर अकबर चौखट ला अटक, 5 लाखांच्या MD ड्रग्जचा साठा जप्त
Mumbai team of Narcotics Control Bureau(NCB) arrested a Nigerian drug peddler in a raid conducted in Navi Mumbai area last night, recovered cocaine from his possession: NCB #Maharashtra
— ANI (@ANI) March 17, 2021
काही दिवसांपूर्वी पुण्यात (Pune) सहा परदेशी नागरिकांकडे एमडी आणि कोकेन ड्रग्ज आढळल्याप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन महिलांचा सुद्धा समावेश असून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल 68 लाख रुपये आहे. हसन अली कासीद, बेकाई हामिस, नामहानक्यू डेविड, मंदा दाऊद हे तांझानिया येथील आहेत. तर पेर्सी नाईगा आणि शामिन नांदवाला हे युगांडा येथून असून यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शामिम, डेविड आणि मंदा या महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघी अन्य तीन जणांसोबत एका रो हाऊसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राहत होत्या. मंदा ही बी. फार्माची विद्यार्थिनी असून बेकिया हा टुरिस्ट व्हिजावर भारतात आला होता. तर कसीद हा गार्मेंट्सचा उद्योग करणार असल्याचे सांगत आला होता. या तिघांकडून बंदी असलेले एमडी आणि कोकेनची विक्री पुण्यातील ग्राहकांना केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.